महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरुवारीही पावसाच्या दमदार सरी

12:18 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 17.5 मि.मी. पावसाची नोंद : खानापूर तालुक्यात सर्वाधिक 73 मि.मी.ची नोंद

Advertisement

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी संततधार पावसानंतर गुरुवारीही दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत 17.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक 73 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. पाऊस पडत असला तरी अद्याप नदी-नाल्यांना पूर आला नाही. त्यामुळे अजूनही पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी दिवसभर अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते.

Advertisement

या पावसामुळे बाजारपेठेमध्ये दलदल पसरली होती. त्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांसह फेरीवाले व इतर व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. तरीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेमध्ये गारवा होता. खानापूर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला. त्या खालोखाल निपाणी तालुक्यामध्ये 29 मि.मी. आणि बेळगाव तालुक्यात 25.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अथणी तालुक्यात गेल्या 24 तासांत सर्वात कमी पाऊस झाला आहे. केवळ 2.1 मि.मी. पाऊस झाला आहे. दरवर्षीच खानापूर व बेळगाव तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. मात्र यावर्षी निपाणी तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.

केवळ सुदैव ....मोठा अनर्थ टळला 

गुऊवारी झालेल्या जोरदार पावसावेळी मजगावच्या मुख्य रस्त्यावरील झाड दुचाकीवर आणि विद्युततारांवर कोसळले. यावेळी जवळच पार्किंग केलेल्या कारवरही विद्युतखांब कोसळला. यावेळी तेथे कोणीच नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कामगार कार्यालयापासून काही अंतरावर असलेले मोठे झाड दुचाकीवर कोसळले. याचबरोबर ते झाड विद्युततारांवरदेखील कोसळल्याने विद्युतखांब पार्किंग केलेल्या कारवर कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ गोंधळ उडाला. मात्र तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तातडीने रस्ता केला बंद

सतत रहदारी असलेल्या व गजबजलेल्या या रस्त्यावर ही घटना घडताच काही तऊणांनी तातडीने दोन्ही बाजूने रस्ता बंद केला. त्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून विद्युततारा बाजूला केल्या. त्यानंतर झाडदेखील बाजूला करण्यात आले. या घटनेमुळे काहीवेळ वाहतूक बंद करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article