For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी यात्रेमुळे रामघाट रोडवर तुफान गर्दी

01:13 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी यात्रेमुळे रामघाट रोडवर तुफान गर्दी
Advertisement

वाहनांच्या लांबचलांब रांगा : वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक : बेनकनहळ्ळीच्या पुढील गावांतील नागरिकांची गैरसोय

Advertisement

बेळगाव : बेनकनहळ्ळी येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी रामघाट रोडवर वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळाल्या. या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक झाली. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप महालक्ष्मी यात्रेची सांगता होताच बेनकनहळ्ळी-गणेशपूर गावच्या महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकाच मार्गावर या यात्रा असल्याने पै-पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. विशेषत: शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेल्या बेनकनहळ्ळी-गणेशपूर महालक्ष्मी यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

इतर मार्गांनी गाठावे लागते गाव

Advertisement

या वाहतूक कोंडीतून पुढे बेळगुंदी, राकसकोप, सोनोली, यळेबैल, बिजगर्णी, कावळेवाडी गावाला जाणाऱ्या नागरिकांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. रस्त्यावर असलेल्या बेनकनहळ्ळी यात्रेसाठी वाहनांची संख्या वाढत असल्याने कॅम्प येथून गावापर्यंत पूर्ण रस्ता वाहनांनी भरून जात आहे. त्यामुळे बेनकनहळ्ळी गावच्या पुढील गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. काही नागरिकांना नाईलाजास्तव सुळगा, कल्लेहोळमार्गे गाव गाठावे लागत आहे.

Advertisement
Tags :

.