कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार

06:41 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चेन्नईत रस्ते, विमानतळ धावपट्टी पाण्याखाली : यलो अलर्ट जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी 11.2 मिमी पाऊस पडून तामिळनाडूला सर्वाधिक फटका बसला आहे. चेन्नई आणि थुथुकुडीच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. चेन्नई विमानतळ धावपट्टीवरही पाणी साचल्याचे वृत्त आहे. रविवारपासून चेन्नईत 10 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडत असल्याचे  भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

केरळ आणि लक्षद्वीपमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आता कर्नाटकच्या किनारी भागासह तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्येही पुढील सात दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान बेंगळूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

केरळमध्ये एकाचा मृत्यू

केरळमध्ये सोमवारी इडुक्की, एर्नाकुलम, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड जिह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रविवारी इडुक्की जिह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मलप्पुरमच्या वाझिक्काडवूमध्ये अनेक रस्ते आणि 50 घरे पाण्यात बुडाली. गुडालूर-कोझिकोड रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. जिह्यातील काराकोडम, कलक्कड आणि अतिथोड नद्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. लक्षद्वीपमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

पुढील सात दिवस पावसाचे

हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकसाठी पुढील सात दिवस पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटक किनारपट्टी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा येथे गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तामिळनाडूमधील इरोड, निलगिरी, कोईम्बतूर, तिरुपूर, दिंडीगुल, थेनी, मदुराई, विरुधुनगर, रामनाथपुरम, शिवगंगा, पुदुक्कोट्टई, तंजावूर, तिरुवरूर, कानचिलापुरम, कांचीलापुरम, विरुवारुरम, चेंगलपट्टू, कु•ालोर आणि नागापट्टिनम येथे 64 ते 111 मिमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article