Maharashtra Rain | पुणे-सातारा-कोल्हापुरात पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे
पुणे -- झारखंड आणि लगतच्या भागावर - असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बहुतांश भागात - मंगळवारी मध्यम - स्वरुपाचा पाऊस पडला. दरम्यान, बुधवारी देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ते मध्यम - स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असून, त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने - वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी
दाबाचे क्षेत्र मंगळवारी उत्तरेकडे सरकत झारखंड व लगतच्या भागावर स्थिर झाले. पुढील दोन दिवस या भागात पाऊस कायम राहणार आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात देखील मंगळवारी पावसाचा जोर होता. त्यातही पुणे शहर, सातारा आणि कोल्हापूर घाट भागातील अनेक जिल्ह्यांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हयात पावसाचा प्रभाव अधिक होता. पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर बाहतूक व्यवस्थेलाही याचा फटका बसला.