For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Rain | कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, १२ तासांत ६ फुटांनी वाढली पातळी!

09:24 AM Jul 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur rain   कोल्हापुरात पावसाचा हाहाकार  पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर  १२ तासांत ६ फुटांनी वाढली पातळी
Advertisement

कोल्हापूर -शहर आणि परिसरासह जिल्ह्यात रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली, गेल्या १२ तासांत पंचगंगेची पाणी पातळी ६ फुटांनी वाढून ती ३२ फुटांवर पोहोचली आहे. यावर्षी पहिल्याच पावसात पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी दुपारी पात्राबाहेर पडले. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सायंकाळपर्यंत ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील ७ धरण प्रकल्पाच्या क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळशी आणि वारणा नदीतून १०० तर घटप्रभा नदीतून ६०३४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. रात्री उशीरा जिल्हयातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु होता.

Advertisement

शहर आणि परिसरात रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी थोडीशी उसंत घेतली. पण नद्यांच्या पाणी पातळीत मात्र टप्याटप्याने वाढ होत गेली. सकाळी पंचगंगेची पाणी पातळी २६ फुटांवर होती ती रात्री उशिरा ३२ फुटांवर पोहोचली. दिवसभरात पाणीपातळीत ६ फुटांनी बाढ झाली. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच
पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हे पाणी पाहण्यासाठी पंचगंगा घाटावर कोल्हापूरकरांनी गर्दी केली. संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारासोबतच शहरातील अन्य बाजारपेठांवरही परिणाम झाला. तेथील वर्दळ कमी झाल्याचे चित्र होते.

जिल्ह्यात यंदा अल् निनोमुळे पावसाला उशीर झाला, अगदी जूनच्या अखेरपर्यंत जनतेला पावसाची प्रतिक्षा करावी लागली. पण जुलैच्या पहिल्या पाच दिवसांतच पावसाने ही कसर भरून काढली. गेली ५ दिवस सुरू असलेल्या संततधारेने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ग्रामीण, डोंगराळ भागात या पावसामुळे भातरोपणीला वेग आला आहे. अन्य भागातही वाफसा आल्याने पावसातही खरीप पेरण्यांनी वेग घेतला आहे. काही ठिकाणी नदीकाठानजीक शेतजमिनीत पाणी आल्याने तेथील पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे.

Advertisement

शहर आणि परिसरासह जिल्हयाच्या ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह धुवांधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बीजपुरवठा खंडित झाला. अगदी शहरालगतच्या भागात सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या बीजवाहिनींवर कोसळल्याने खंडित बीजपुरवठ्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती महावितरणकडून देण्यातपंचगंगा पात्राबाहेरआली.

जिल्ह्यातील ७ धरणक्षेत्रांमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अद्यापी पाऊस सुरू आहे. गेल्या १२ तासांत सात प्रकल्पांच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये राधानगरी धरण क्षेत्रात ११८ मिलिमीटर, तुळशी ९३ मिलिमीटर,
दुधगंगा १०० मिलिमीटर, पाटगाव १४२ मिलिमीटर, चिकोत्रा ९६ मिलिमीटर, चित्री ९० मिलिमीटर यांचा समावेश आहे.जिल्ह्यात पाण्याखाली गेलेले

बंधारे असे :वेदगंगा नदी : बस्तवडे, मिरवली, कुरणी, निळपण, वाघापूर, सुरूपली, गारगोटी, म्हसवे. घटप्रभा नदी: कानडी सावर्डे, कुंभी नदी : शेणबडे, कळे, सांगरूळ, दूधगंगा नदी : सिद्धनेर्ली, दत्तवाड, पंचगंगा नदी शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. कासारी नदी यवलुज, बाजार भोगाव, पुनाळ, तिरपण, बालोली, ठाणे, आळवे. वारणा नदी: कोडोली, मांगले, साबर्डे, कडवी नदी : कोपार्डे, सवते सावर्डे, सरूड, पाटणे, भोगावती नदी हळदी खडक कोगे, सरकारी कोगे, राशिवडे.

Advertisement
Tags :

.