For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी

06:05 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेश  राजस्थानमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी
Advertisement

अनेक जिल्ह्यात पूरस्थिती : हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशोकनगर जिह्यात रविवारी पाण्याची पातळी वाढल्याने महाराणी लक्ष्मीबाई धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. पाणी प्रवाह वाढल्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा महामार्गही काही वेळ ठप्प झाला होता. राज्यात 58 टक्के म्हणजेच 21.6 इंच पाऊस झाला आहे. हे सामान्यपेक्षा 2.6 इंच जास्त आहे. राजस्थानमध्ये पावसाळ्यात आतापर्यंत 21 टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यात 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 231.3 मिमी पाऊस पडतो, तर या हंगामात आतापर्यंत 280.6 मिमी पाऊस झाला आहे.

Advertisement

काश्मीरमध्येही ढगफुटीसदृश

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिह्यातील कंगनमध्ये शनिवारी रात्री उशिरा ढगफुटीसदृश पावसाची घटना घडली. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अनेक घरांचेही नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून काश्मीर खोरे व लडाख यांच्यातील संपर्क तुटला आहे.

हिमाचलमध्ये बचावकार्य सुरूच

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीच्या घटनांमुळे 114 रस्ते बंद आहेत. हवामान खात्याने 7 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात 27 जून ते 1 ऑगस्ट दरम्यान पाऊस, पूर आणि भूस्खलनात 79 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी रामपूरच्या समेजमध्ये ढगफुटीमुळे 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 45 जण बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी रविवारी सलग चौथ्या दिवशीही बचाव आणि शोधमोहीम सुरूच होती. प्रभावित भागात पोहोचण्यासाठी भारतीय लष्कराने तात्पुरता पूल बांधला आहे. ढिगारा आणि खडक हटवण्यासाठी जेसीबीचाही वापर केला जात आहे. एनडीआरएफ, सीआयएसएफ आणि भारतीय लष्कर घटनास्थळी उपस्थित आहे. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असले तरी त्यांची ओळख पटलेली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अजूनही 36 लोक बेपत्ता आहेत.

Advertisement
Tags :

.