महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुदली भागात वळीव पावसाचा तडाखा

10:46 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लक्ष्मी यात्रेत आलेल्या भाविकांची तारांबळ : शिवारातील पिके जमीनदोस्त

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री
Advertisement

हुदली व परिसरातील रामापूर, रंगदोळी, तुम्मरगुद्दी भागात शुक्रवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास दीड तास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपून काढल्याने गावात व शिवारात पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्याने शिवारातील अनेक विद्युतखांब  उन्मळून पडले आहेत. अनेक घरांची हानी झाली असून लाखे रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शिवारातील भाजीपाला पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. वादळी पावसामुळे हुदली व परिसरातील रामापूर, रंगदोळी, तुम्मरगुद्दी, सुलधाळ, अंकलगी व आदी भागातून आलेल्या भाविकांची एकच तारांबळ उडाली. रथोत्सव सुरू असतानाच हुदली भागाला वळिवाचा दणका दिल्याने यात्रेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या दुकानांत पाणी शिरल्याने पाण्याबरोबर प्लास्टिक व अनेक प्रकारच्या खेळण्यांच्या स्टॉल्समध्ये पाण्यात वाहून गेली आहेत. पावसामुळे दुकानमालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article