महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शनिवारी दमदार सरींनी उडविली तारांबळ

06:02 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अचानकपणे जोरदार सरी कोसळल्याने काहीसा दिलासा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सध्या दमदार पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत. शनिवारी अचानकपणे जोरदार सरी कोसळल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. तर गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते. अचानक आलेल्या दमदार पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. पाऊस झाला तरी काहीवेळातच त्याने पुन्हा उसंत घेतली.

मान्सूनचे आगमन झाल्याचे दिसून येत असले तरी पावसाला म्हणावा तसा जोर अद्याप तरी दिसत नाही. सध्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. जुलै महिन्याला सुरुवात होत असताना पाऊस मात्र अद्याप तरी मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. ढगाळ वातावरण दिवसभर रहात आहे. मात्र, संततधार पाऊस होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाल्याने दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसल्याची चर्चा सुरू आहे.

शनिवारी सकाळी काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान काही भागामध्ये दमदार पाऊस झाला. दुपारी अडीचच्या सुमारालाही शहरावर दमदार सर कोसळली. या पावसामुळे काहीवेळ साऱ्यांनाच आडोसा शोधावा लागला. मान्सून असला तरी सध्या वळिवासारखाच पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमदार पाऊस होईल की नाही? अशी शंका जाणकारांतून व्यक्त होत आहे. पाऊस झाल्यानंतर गारवा निर्माण झाला पाहिजे. मात्र, गारव्याऐवजी उकाडा जाणवू लागला आहे.

सध्या शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी भाताची उगवण चांगली झाली आहे. त्याचबरोबर बटाटा व भातरोप लागवडीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. दमदार पाऊस झाला तरच ही कामे करता येणे शक्य आहे. त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह सारेजण आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#akaluj #tarunbharatnews
Next Article