For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

11:40 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Advertisement

पणजी : मान्सून गोव्यावर सक्रिय झाला असून आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वऊपात पाऊस पडला. गुऊवारी दिवसभर ऊन पडले होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. रात्री पावसाला प्रारंभ झाला. हवामान खात्याने गुऊवारी जो अंदाज व्यक्त केला त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. गोव्यात मान्सून मुसळधारपणे पोहोचला आणि त्यानंतर त्याचा जोर कमी झाला. मात्र आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 किमी.पर्यंत वाढणार आहे. मान्सूनने दमदारपणे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणापर्यंत आगमन केलेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये म्हापसा, दाबोळीमध्ये प्रत्येकी सुमारे 1 इंच, पेडणे 6.4 मि.मी., फोंडा 3 मि.मी., पणजी 8.1 मि.मी तर जुने गोवे येथे दीड इंच पावसाची नोंद झाली. सांखळीत 6.4 मि.मी एवढी पावसाची नोंद झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.