For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

06:30 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्मयता आहे. हवामान विभागाने 28 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्यातील 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्मयता असून काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्मयता आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याबरोबरच रस्त्यांवरील वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राजधानी बेंगळूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू असल्याने शहरात थंड वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कर्नाटकात पावसाचा प्रभाव आणखी काही दिवस जाणवण्याची शक्मयता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.