For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवृष्टी : मदतीसाठी तातडीने पावले उचला!

10:43 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
अतिवृष्टी   मदतीसाठी तातडीने पावले उचला
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : पीक नुकसानीबाबत लवकर संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करा

Advertisement

बेंगळूर : राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान ‘कृष्णा’ येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. मुसळधार पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची व उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. पावसामुळे पीकहानी आणि घरांची पडझड झालेल्यांना योग्य मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना त्यांनी दिली.

पावसामुळे 11 बळी

Advertisement

एप्रिलपासून राज्यात पावसामुळे एकूण 111 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये भरपाई वाटप करण्यात आली आहे. एकूण 5.55 कोटी ऊ. नुकसान भरपाई दिली आहे. पावसामुळे 651 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर 9087 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पूर्णपणे नुकसान झालेल्या 649 घरांसाठी आणि अंशत: नुकसान झालेल्या 8,068 घरांसाठी भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित घरांना गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे देण्यासाठी पावले उचलावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमुळे एकूण 766 गुरे मृत्युमुखी पडली असून 1.52 कोटी ऊ. भरपाई वाटप केली आहे. पिकांच्या नुकसानीबाबत शक्मय तितक्मया लवकर संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करावे. पिकांच्या नुकसानीची भरपाई वाटप करावी. अतिवृष्टीमुळे 4,80,256 हेक्टर शेती पिकांचे आणि 40407 हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.

एकूण 5,20,663 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असेही  सिद्धरामय्यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी आता गेल्या वषीच्या तुलनेत थोडी कमी आहे. प्रमुख जलाशयांची कमाल क्षमता 895.62 टीएमसी आहे व सध्याचा साठवणूक क्षमता 840.52 टीएमसी आहे. गेल्यावषी याच काळात 856.17 टीएमसी जलसाठा होता. 1 जून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील खरीप हंगामात नेहमीपेक्षा 4 टक्के जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत सामान्य पाऊस 721 मि. मी. होता. तो गत वषीपेक्षा 23 टक्के जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. तुंगभद्रा जलाशय क्रस्ट गेट्सच्या दुरुस्तीची जबाबदारी तुंगभद्रा मंडळाची आहे असे सांगत त्यांनी पहिल्या पिकासाठी पाणी सोडण्यापूर्वी दुऊस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.

Advertisement
Tags :

.