For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Monsoon Update | कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

09:18 PM Jul 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
monsoon update   कोकण  मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार मुंबई  ठाण्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
Advertisement

त. भा. प्रतिनिधी, पुणे
कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात आठवडाभर पावसाचा जोर वाढणार असून, त्यात मुंबईसह काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पंजाब, झारखंड, दक्षिण उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर आंध्रप्रदेश, मध्य आसामच्या भागावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती आहे. याशिवाय पश्चिममध्य बंगालचा उपसागर आंध्र प्रदेश तसेच उत्तरपूर्व अरबी समुद्रादरम्यान हवेचा दाब पसरला आहे.

Advertisement

याच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीरसह हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही राज्यांना सोमवारी अतीवृष्टीने झोडपले. या सर्व हवामानातील घडामोडींमुळे राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात वाढ झाली आहे.

याशिवाय अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे येत असल्याने कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील काही दिवस पाऊस वाढणार असून, पुढील दोन दिवस काही भागात ऑरेंज अलर्टदेण्यात आला आहे.

Advertisement

यात मंगळवारी 21 जुलै रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्हा घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, सातारा घाट परिसरात मध्यम स्वऊपाच्या वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारी 22 जुलै रोजी रायगड, पुणे जिल्हा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातील काही जिल्ह्यांसह पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक घाट, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसरात जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. पुढे गुऊवारी, शुक्रवारी देखील या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारपासून ऊन पावसाचा मारा सुऊच आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा पसरला आहे. पावसाच्या लपंडावामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Advertisement
Tags :

.