बेळगावसह धारवाडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. आणखी दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या विविध भागात सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या उडुपी आणि कारवार जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मंगळूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाची शक्मयता आहे. उत्तर आणि दक्षिणच्या अंतर्गत भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बेळगाव आणि धारवाडमध्ये नियमित वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. बिदर, गदग, बागलकोट, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.
शिमोगा, चिक्कमंगळूर आणि हासन या दक्षिणेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. बळ्ळारी, बेंगळूर शहर, ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, कोलार, दावणगेरे, कोडगू, मंड्या, रामनगर, म्हैसूर, विजयनगर आणि तुमकूर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.