For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकसकोप जलाशय परिसरात दमदार पाऊस

06:27 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राकसकोप जलाशय परिसरात  दमदार पाऊस
Advertisement

वार्ताहर / तुडये

Advertisement

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत वळीव पावसाने जोर कायम ठेवल्याने पाणीसाठ्यात नाममात्र वाढ होणार आहे.

यावर्षी जलाशय परिसरात वळीव पावसाने हुलकावणी दिली होती. जानेवारी महिन्यापासून केवळ 30 मि.मी. पाऊस झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी या परिसरात तुरळक असा 1.8 मि.मी. पाऊस झाला. मात्र सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढण्यास फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

शनिवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2455.95 फूट इतकी होती.

अजून आठ फूट पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. यावर्षी बेळगाव शहराला पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही.

आठ फूट वापरण्यास उपलब्ध असलेले पाणी, तसेच डेडस्टॉकमधील  सात-आठ फूट पाणी शहराला दोन महिने नक्कीच पुरणारे आहे.

एप्रिल महिन्यात शहराला साडेचार फूट पाणी वापर

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी (01/04/2024 रोजी) जलाशयाची पाणीपातळी 2462.00 इतकी होती.

महिनाभरात केवळ साडेचार फूट पाणीसाठा बेळगाव शहराला सोडण्यात आला आहे. मागील दोन वर्षे पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यात आला नाही.

बेळगाव शहराला पाणीपुरवठा हा काही वॉर्डातून मुबलक तर बऱ्याच ठिकाणी आठ-पंधरा दिवसांतून करण्यात येतो.

Advertisement
Tags :

.