कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेड, चिपळूण, राजापुरात मुसळधार

03:32 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड, चिपळूण, राजापूर :

Advertisement

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळला. खेड, चिपळूणसह राजापूर तालुक्यात शुक्रवारी मुसळधार अवकाळी पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडवली. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला. अवकाळीमुळे आंबा बागायतदारांच्या उरात मात्र धडकीच भरली आहे.

Advertisement

शुक्रवारी दुपारपासून धुवाँधार कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने खेड तालुक्याला झोडपून काढले. शहरासह ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. विशेषत: ग्रामीण भागात जत्रोत्सवासह ग्रामदेवतांच्या उत्सवांवर पाणी फेरले आहे. अवकाळी पावसाचा आंबा बागायतदारांनाही फटका बसला असून चिंता कमालीची वाढली आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतही सन्नाटा पसरला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरुच होती. खेड शहरासह ग्रामीण भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता होती. अखेर दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावताच साऱ्यांचीच तारांबळ उडाली. पावसाच्या संततधारेमुळे मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला.

अवकाळी पावसातच नगर परिषद हद्दीतील गटारे तुंबल्याने नगर प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामाचा पुरता फज्जा उडाल्याचेही समोर आले आहे. गांधी चौकात गटारातील पाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधी पसरली. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला. तालुक्यात गावोगावी ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवांसह देवतांच्या उत्सवांचा सिलसिला सुरू आहे. अवकाळी पावसामुळे साऱ्यांचीच दाणादाण उडून भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले. अवकाळीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. तीनबत्तीनाका येथे सकाळपासूनच व्यावसायिक हापूस विक्रीसाठी दाखल झाले होते. ग्राहकांचीही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. पाऊस कोसळताच बागायतदारांची पळापळ झाली. दुपारी 3 च्या सुमारासही पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. खाडीपट्टा विभागालाही पावसाने झोडपून काढले. खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

शुक्रवारी दुपारी चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. मात्र तो रात्री पडल्याने त्याचा तितकासा परिणाम जाणवला नाही. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच येथे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी 12.30 वाजता तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावाधाव झाली. अनेकांचे साहित्य यात भिजले. तर अनेकांना भिजतच प्रवास करावा लागला. यामुळे काही भागातील वीज काही तास गायब झाली होती. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे आंबा बागायतदार व शेतकरीवर्ग धास्तावला आहे.

राजापूर : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळला. गुरुवारी सकाळी अवकाळीने जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी सायंकाळीही पावसाचा शिडकावा झाला. अवकाळी पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या तालुकावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरापासून तालुक्यात प्रचंड उष्मा वाढला आहे. अशातच अवकाळी पाऊस पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. ते अंदाज खरे ठरताना गुरुवारी सकाळी तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला. ढगांच्या गडगडाटात झालेला पाऊस पुढे सुमारे तासभर जोरदार पडत होता. दरम्यान, शुक्रवारीही अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी पावसाचा काहीसा शिडकावा झाल्यानंतर सायंकाळीही रिमझिम पाऊस पडला. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. या अवकाळी पावसात तालुक्यात फारसे कुठेही नुकसान झालेले नाही. मात्र सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळीने लग्नसराईची धुमधाम असलेल्या यजमानांची चिंता वाढवली आहे.

दापोली : गेले 2 ते 3 दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यातच शुक्रवारी पहाटे काही तास पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरुप आले. दापोलीत दोन दिवस रात्री पाऊस सुरू झाला की वीज गायब होवून ती सकाळी सुरू होत आहे. यामुळे अवकाळी पावसातच महावितरणच्या मर्यादा उघड झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. गुरांसाठी वैरण भरणे, लाकूडफाटा जमा करणे आदी कामे उरकताना ग्रामस्थांची धांदल होत आहे. काही ठिकाणी घरांची कामे सुरू असल्याने तेथेही काही साहित्य भिजले. शुक्रवारी पहाटे काही तास पडलेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. दापोलीत 4.8 मि.मी. पावसाची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article