महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात दमदार पाऊस

11:53 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक ठिकाणी पाणी साचून, नदी-नाले तुडूंब

Advertisement

बेळगाव : शनिवारीही पावसाने शहरासह तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब झाले असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बळ्ळारी नाल्याला पूर आला असून यावर्षीही शेतीला फटका बसला आहे. या पावसामुळे जुना पी. बी. रोड, जिजामाता चौक परिसराला तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा उघडकीस आला असून या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

दमदार पावसामुळे शनिवारी अनेक ठिकाणी पाणी साचून होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेले रस्ते व गटारी निकृष्ट दर्जाच्या असल्याचे दिसून आले. गटारीतील पाणी व कचरा रस्त्यावरून वाहत होता.

या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. पाऊस दिवसभर कोसळत होता. त्यामुळे बाजारपेठेमध्येही दलदल झाली होती. भरपावसामध्ये रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांची तारांबळ उडाली. पादचारी तसेच दुचाकीस्वारांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. सखल भागांमध्ये दिवसभर पाणी साचून होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अधिकच वाढत चालल्याने आता पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीला पूर आला आहे. इतर नदी-नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच शनिवारीही जोरदार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article