महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावसह अकरा जिल्ह्यात तीन दिवस मुसळधारचा अंदाज

10:28 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : यापूर्वीच बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह होत असलेला पाऊस पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. शनिवारी कारवार जिल्ह्याच्या हल्ल्याळ, यल्लापूर, कुमठा, गोकर्ण, मुंडगोडू, मंकी, चिक्कमंगळूरच्या कोप्प, कम्मरडी, बाळेहोन्नूर, जयपूर, कोट्टीगेहार, कडूर, एनआरपूर, उडुपीच्या कुंदापूर, कोट, सिद्धापूर, मंगळूर जिल्ह्याच्या धर्मस्थळ, सुळ्या येथे मुसळधार पाऊस झाला आहे. बेळगाव, विजापूर, धारवाड, हावेरी, बागलकोट, बिदर, गदग, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, यादगिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. बेंगळूर, बेंगळूर ग्रामीण, कोलार, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, रामनगर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, हासन, चिक्कमंगळूर, शिमोगा, विजयनगर,  दावणगेरे जिल्ह्यात सोमवारी जोरदार पाऊस तर उडुपी, मंगळूर व कारवार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस साधारण पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article