For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुलमर्गमध्ये प्रचंड हिमस्खलन

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुलमर्गमध्ये प्रचंड हिमस्खलन
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये गुऊवारी प्रचंड हिमस्खलनाचा तडाखा बसला. हे हिमस्खलन गुलमर्गच्या मागील भागात घडले. या अपघातात एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. तीन विदेशी नागरिक पर्यटनाच्या निमित्ताने येथे फिरत असताना ही दुर्घटना घडल्याचे मदत आणि बचाव पथकाकडून सांगण्यात आले. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जम्मू भागात सध्या जोरदार हिमवर्षाव होत आहे. हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग चौथ्या दिवशीही बंद होता. रामबन-बनिहाल सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी डोंगरावर दरड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. गुलमर्गमध्ये हिवाळ्यात होणाऱ्या हिमवर्षावात वेगवेगळ्या स्पर्धा सुरू असतात. या स्पर्धांच्या निमित्ताने देशभरातील खेळाडूंसोबतच क्रीडाप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे पोहोचले आहेत.  पुढील 24 तासांत डोडा, किश्तवाड, पूंछ, रामबन, कुपवाडा आणि गंदरबल जिल्ह्यांमध्ये 2000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमस्खलन होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे.

सिक्कीममध्येही जोरदार बर्फवृष्टी

Advertisement

हिमालयीन राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हिवाळ्यातील ही दुसरी बर्फवृष्टी आहे. हिवाळ्याच्या सुऊवातीला डोंगरावर नगण्य हिमवृष्टीची नोंद झाली होती, मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सातत्याने बर्फ पडत आहे. उत्तर आणि पूर्व सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) गुऊवारी एका निवेदनात दिली. सिक्कीमच्या उत्तर आणि पूर्व भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.

Advertisement
Tags :

.