For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वर्गाचे पृथ्वीवरील द्वार

06:03 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वर्गाचे पृथ्वीवरील द्वार
Advertisement

ब्राझील देशातील अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घटदाट वन जगप्रसिद्ध आहे. याला जगाचे ‘फुप्फुस’ म्हणूनही ओळखले जाते. या नैसर्गिक वनात ‘फुमासिन्हा’ नामक एक झरा असून त्याला स्वर्गाचे पृथ्वीवरील द्वार असे म्हणतात. हे एक जगप्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. मात्र, या स्वर्गाच्या द्वारी जाण्यासाठी पर्यटकांना बरेच कष्ट करावे लागतात. तसेच थोडा धोकाही पत्करावा लागतो. हा अनुभव जितका संमोहित करणारा आहे, तितकाच तो भीतीने थरकाप उडविणाराही आहे, असे याचे वर्णन केले जाते. फुमासिन्हा हा पोर्तुगीझ भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘धुराचा ढग’ असा आहे. हा झरा साधारणत: 100 मीटर किंवा 328 फूट उंचीवरुन खाली कोसळतो. एखाद्या धबधब्याप्रमाणे तो भासतो. पण तांत्रिकदृष्ट्या तो धबधबा नाही. याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्या असे की याचे पाणी 100 मीटर उंचीवरुन खाली पडत असले, तरी ते भूमीपर्यंत पोहचतच नाही. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे त्या पाण्याचे सूक्ष्म तुषारांमध्ये रुपांतर होते आणि या तुषारांपासून धुक्याचे एक चादरीच्या आकाराचे वलय बनते. त्याच्या या विलक्षण वैशिष्ट्यामुळे त्याला ‘स्वर्गाचे पृथ्वीवरचे द्वार’ असे संबोधले जाते. हा झरा बराच उंचावर असल्याने तेथपर्यंत जाणे हे देखील एक दिव्य आहे, जे मोजके लोकच करतात.

Advertisement

हे स्थान अमेझॉन वनातील चापडा डायमंटिना राष्ट्रीय उद्यानात आहे. तेथे जाण्यासाठी उंचसखल भाग पार करत जावे लागते. एका पर्वताच्या घाटावर हे स्थान आहे. तेथे जाण्यासाठी कोणताही आखीव मार्ग नाही. किंवा उंचसखल प्रदेशातून जाण्यासाठी लोखंडी बार किंवा कोणता आधारही बांधण्यात आलेला नाही. अतिशय अरुंद आणि दाट झाडीच्या प्रदेशातून वाट काढत जावे लागते. कोणी अनुभवी मार्गदर्शक असल्याशिवाय नेमकी वाट सापडत नाही. हे स्थान त्यामुळेच ‘भूलभुलैयां’ म्हणून परिचित आहे. चुकून जरी मार्ग चुकला, तर पर्यटक भरकटत जातो आणि त्याचा मृत्यूही ओढवू शकतो.

Advertisement
Advertisement
Tags :

.