For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News | नगराध्यक्षा भालके-नगरसेवकांमध्ये खडाजंगी

02:08 PM Jun 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
political news   नगराध्यक्षा भालके नगरसेवकांमध्ये खडाजंगी
Advertisement

दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमनेसामने

Advertisement

पंढरपूर : सभागृहातील हा वाद जाहीरपणे रस्त्यावर आल्यामुळे पंढरपूरकर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, विकास कामात राजकारण थांबवा, अशी मागणी केली आहे. प्रभाग ९ मधील जुनी पेठ परिसरात सध्या ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

हे काम करत असताना पाईपलाईन अधिक खोलवर घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांच्याकडे केली होती. मात्र, नगरसेवकांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्याशी संपर्क साधला.

Advertisement

तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष भालके या कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी करण्यासाठी जुनी पेठेत पोहोचल्या. नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके घटनास्थळी आल्याचे समजताच नगरसेवक लक्ष्मण शिरसट आणि भाजपचे पदाधिकारीही तेथे जमा झाले. पाहणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींमध्ये कामाच्या दर्जावरून आणि अधिकारांवरून शाब्दिक चकमक उडाली.

हा वाद इतका वाढला की दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमनेसामने आले आणि त्यांच्यात मोठी खडजंगी झाली. नगरपरिषदेच्या चार भिंतींच्या आत चालणारा हा राजकीय कलह थेट प्रभागात पहायला मिळाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.

‘विरोधाला-विरोध’ आणि संतापलेले मतदार

पंढरपूर नगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता असून नगराध्यक्षपद शिवसेना (शिंदे) गटाकडे आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच सत्ताधारी भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे. मात्र, या राजकीय संघर्षामुळे शहराच्या मूलभूत विकासाचा बळी जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्यावर मतदार या राजकारण्यांना योग्य धडा शिकवतील, अशी संतप्त प्रतिक्रिया जुनी पेठ भागातील रहिवाशांनी दिली आहे. शहराच्या हितासाठी तरी दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, अशीच अपेक्षा सध्या सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

 

Advertisement
Tags :

.