For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहार-झारखंडसह 12 राज्यात उष्णतेची लाट

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहार झारखंडसह 12 राज्यात उष्णतेची लाट
Advertisement

देशातील 17 भागात पारा 42 पार : आंध्रात रायलसीमामध्ये सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमान

Advertisement

 वृत्तसंस्था /नवी दिल्ली

देशातील 12 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत येथील उष्मा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, शनिवारी देशातील 7 राज्यांतील 17 भागात पारा 42 अंशांच्या पुढे गेला. आंध्र प्रदेशातील रायलसीमा येथे सर्वाधिक 44.5 अंश तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश, केरळ आणि सिक्कीममध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांच्या काही भागात बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील 33 जिह्यांमध्ये गारांसह पावसाची शक्मयता आहे. या काळात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हवामान खात्याने बिहारमधील 24 जिह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

 उष्णतेच्या लाटेपासून 17-18 एप्रिलपर्यंत दिलासा

स्कायमेटच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार होत असल्याचे दिसत आहे, तर एक लाट कर्नाटकपासून पूर्व मध्य प्रदेशपर्यंत पसरेल. याशिवाय पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळविरोधी प्रणाली तयार होत असून त्यामुळे हवामान प्रणालीत आर्द्रता वाढेल. या आधारावर 17 किंवा 18 एप्रिलपर्यंत लोकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.

बिहारमध्ये शाळांच्या वेळेत बदल

बिहारच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसू लागल्यामुळे राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास उष्णतेची लाट लक्षात घेता मुलांना नियोजित वेळेपूर्वी उन्हाळी सुटी देण्याचा विचारही सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढलेल्या आदेशात शाळकरी मुलांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शाळा एकतर सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात किंवा उन्हाळी सुट्या नियोजित वेळेपूर्वी जाहीर कराव्यात, असे म्हटले आहे. यासोबतच सर्व ऊग्णालयांमध्ये औषधे आणि खाटा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात सर्व जिह्यांमध्ये फिरती वैद्यकीय पथकेही तयार केली जाणार आहेत. याशिवाय सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये औषध म्हणून ओआरएसची पाकिटे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.