महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र-गुजरातमध्ये उष्मालाटेचा इशारा

06:35 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये तापमान 41 अंशांच्या पुढे : हिमाचल, उत्तराखंडमध्ये गारा बरसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी 20 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. चालू आठवड्यात तापमान खूप वाढणार असून तीव्र उष्णता जाणवणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसह तीव्र उष्मा जाणवेल. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यकता असल्यासच दुपारच्यावेळी घराबाहेर पडावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

ओडिशा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि गुजरातचे कच्छ, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्मयता आहे. हवामान खात्याने लोकांना उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी अधिका पाणी पिण्यास सांगितले आहे. लोकांनी सुती कपडे घालून, डोके झाकून किंवा माथ्यावर कापड गुंडाळून बाहेर जावे, असे आयएमडीने म्हटले आहे. लोकांनी टोपी घालून किंवा छत्री घेऊनच घराबाहेर पडणे चांगले असल्याचे सांगण्यात आले.

16-20 एप्रिल दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या विविध भागात उष्णतेची लाट अपेक्षित आहे. मंगळवार-बुधवारनंतर उत्तर कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ; तटीय आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये बुधवार-गुऊवार आणि तेलंगणामध्ये मंगळवार-गुऊवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिह्यांसाठी 20 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी केला आहे. दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम वर्धमान, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, पुऊलिया, झारग्राम, बीरभूम, मुर्शिदाबाद आणि बांकुरा जिह्यांमध्ये या आठवड्याच्या शेवटपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील.

या आठवड्यात दक्षिण आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे वाढत्या तापमान आणि उष्णतेपासून दिलासा मिळेल. 18 ते 20 एप्रिलदरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या अनेक राज्यांमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण ढगाळ राहील. राष्ट्रीय राजधानीत अंशत: ढगाळ आकाश आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 19 एप्रिल रोजी गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article