राज्यात उकाडा वाढला
03:07 PM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यात दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला असून शुक्रवारी कमाल पारा 35. 6 पर्यंत पोहोचला होता. उकड्यामुळे नागरिक प्रचंड प्रमाणात हैराण झाले. सध्या तापमान बरेच वाढलेले असून आजही पारा 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील आणि त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होऊ शकते. गोव्याच्या काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडून जातील, असाही अंदाज आहे. गोव्यात काल शुक्रवारी सकाळी किमान तापमान 26 अंश एवढे होते.
Advertisement
Advertisement