राज्यात उकाडा वाढला
01:07 PM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यातील आज उष्णतेचा पारा बराच वर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा इशारा दिला असून याकरिता यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी 48 तास हे उष्णतेचे दिवस असतील. या कालावधीमध्ये तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढलेले असेल आणि उकाडा होईल. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावधता बाळगणे आवश्यक आहे. मंगळवारी राज्यात 34 डिग्री सेंटीग्रेड एवढे तापमान होते मात्र उकाडा बराच वाढला होता. आज हवामान थोडे ढगाळ राहील व गोव्याच्या बऱ्याच भागात उकाडा त्रासदायक ठरू शकतो. हवामान खात्याने 15 आणि 16 एप्रिल हे दोन दिवस प्रचंड उकाड्याचे दिवस राहतील, असे म्हटले आहे.
Advertisement
Advertisement