For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | हृदयद्रावक घटना : आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू

11:40 AM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   हृदयद्रावक घटना   आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू
Advertisement

                             करवीर तालुक्यात दुहेरी अंत्यसंस्काराने शोककळा

Advertisement

सडोली खालसा : आईच्या मृत्यूचा धक्का, सहन न झाल्याने मृत्यूनंतर लेकीचा मृत्यू झालेली हृदय द्रावक घटना शुक्रवार रात्री दहा वाजता बाचणी तालुका करवीर येथे घडली. हौसाबाई गणपती पाटील 72व सुवर्णा विठ्ठल राजगिरे वय 47 अशी मयत माय लेकीची नावे आहेत.

बाचणी तालुका करवीर येथील वयोवृद्ध श्रीमती हौसाबाई गणपती पाटील वय 72 या गेली तीन आठवडे आजारी होत्या. पतीचे छत्र हरवल्याने तसेच मुलगा नसल्यामुळे त्यांची सेवा त्यांच्या चौघी मुली करत होत्या. सर्वच मुली लग्न झाल्याने आपापल्या घरी संसार करत आहेत आणि आपल्या वयोवृद्ध आईकडे लक्ष देत असत..

Advertisement

आई आजारी असल्यामुळे अंथरूणात होती आईची सेवा करण्यासाठी सर्वच मुली हजर होत्या परंतु दुर्दैवाने शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान आई हौसाबाई यांचा मृत्यू झाला. त्यावेळी सेवा करणाऱ्या सुवर्णा विठ्ठल राजगिरे रा.चुये यांना आईचा मृत्यू धक्का सहन न झाल्याने अवघ्या पंधराव्या मिनिटात तिचाही मृत्यू झाला .

तिच्यावर चुये.ता करवीर येते अंतिम संस्कार करण्यात आले तिच्या पश्चात पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.गेली आठ दहा दिवस सेवा करणारे मुलगी सुवर्णा हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

Advertisement
Tags :

.