For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Malkapur accident | मलकापूरमध्ये काळजाचा थरकाप! भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा अंत; चालक फरार

01:16 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
malkapur accident   मलकापूरमध्ये काळजाचा थरकाप  भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा अंत  चालक फरार
Advertisement

                          मलकापूर महामार्गावर अपघात

Advertisement

कराड -मलकापूर येथील महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७३ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत दोन दिवस उपचार सुरू असताना अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असरार यासीन शेख (वय ३२, रा. खंडोबा नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वडील महम्मद यासीनआप्पालाल शेख (वय ७३) हे कराड येथील उड्डाणपूल बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. १ मे रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान मलकापूर येथील प्रियदर्शनी प्लायवूड दुकानासमोर कोल्हापूर ते पुणे मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कराड शहर पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.