For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाताच थांबायची हार्ट बीट

06:17 AM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
खाताच थांबायची हार्ट बीट
Advertisement

काही खाताना किंवा पाणी पिताना एखाद्या इसमाचे हृदय धडधडणे थांबवू शकते का? हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही ब्रिटनमधील एका महिलेसोबत असेच घडत होते. स्थिती इतकी गंभीर होती की तिला दरवेळी खाताना आपले हृदय थांबून पुन्हा न धडधडले तर अशी भीती सतावत होती. ब्रिटनच्या हर्टनफोर्डशाअरच्या सेंट एल्बंसमध्ये राहणारी 50 वर्षांच्या सारा हॉल एक अत्यंत दुर्लभ आजाराला तोंड देत होती. या आजारामुळे काही खाताच त्यांचे हृदय धडधडण्याचा वेग अत्यंत मंदावत होता आणि अनेकदा काही वेळासाठी थांबत देखील हेते.

Advertisement

एका दिवसात 12 वेळा थांबले हृदय

सारा यांचे हृदय एकदा केवळ 24 तासांमध्ये 12 वेळा थांबले होते यातून त्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो. खातान किंवा पाणी पिताना त्यांना चक्क येऊ लागायची, डोळ्यांसमोर अंधार दाटून यायचा आणि अनेकदा त्या बेशुद्ध होत कोसळायच्या. हळूहळू स्थिती इतकी खराब झाली की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी खाणेच जवळपास बंद केले. काही खाताना आपले हृदय थांबण्याची भीती त्यांना सतावत होती.

Advertisement

परिवारालाही चिंता

सारा या दोन मुलांच्या आई आहेत. परिवारासोबत खाणे देखील तणावपूर्ण अनुभव ठरला होता. माझ्या पतीला नेहमी माझ्यानजीक बसावे लागत होते, जेणेकरून मी बेशुद्ध पडल्यास त्वरित मदत करता येईल. तर आई बेशुद्ध न पडता जेवण पूर्ण करू शकेल की नाही या विचाराने मुले त्रस्त असायची. आजारामुळे मी ड्रायव्हिंग सोडले होते आणि अनेक महिन्यांपर्यंत कामावरूनही सुटी घ्यावी लागली असे सारा सांगतात.

डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय

सारा यांना पहिल्यांदा वयाच्या 39 व्या वर्षी बेशुद्धी आणि उलटी होणे यासारख्या समस्या होऊ लागल्या होत्या. नंतर जेवताना त्यांना चक्कर येणे आणि काळासोबत लक्षणं गंभीर होत गेली. बहुधा हे लो ब्लड शुगर किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे घडत असावे असे त्यांना प्रथम वाटले. परंतु स्वत:च्या मुलांसमोर कौटुंबिक लंचमध्ये बेशुद्ध पडल्यावर त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

आजाराचे निदान

तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सारा यांना ‘कार्डियोइनहिबिटरी स्वॉलो सिंकोप’ नावाचा अत्यंत दुर्लभ आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात आतापर्यंत याचे 150 हून कमी रुग्ण नोंदविले गेले आहेत. या आजारात अन्न किंवा पाणी गिळल्यावर शरीराचे वॅगस नर्व गरजेपेक्षा अधिक प्रतिक्रिया देऊ लागते, यामुळे हृदयाचे ठोके अचानक मंदावतात किंवा काही वेळासाठी थांबूही शकतात. साराच्या प्रकरणी हृदय एक मिनिटापर्यंत बंद पडत हेते.

विशेष उपचार प्रक्रिया

सामान्य उपचाराने फायदा न झाल्यावर डॉक्टरांनी साराला एका विशेष वैद्यकीय परीक्षणात सामील केले. यात ‘कार्डियोन्यूरल एब्लेशन’ नावाच्या आधुनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानात डॉक्टर शरीराच्या अशा नसांना लक्ष्य करतात, जे हृदयाच्या धडधडण्याला असामान्य स्वरुपात मंद करतात. यासाठी मांड्यांमधून कॅथेटर हृदयापर्यंत पोहोचविले जाते. मग नसांच्या हालचालींचा नकाशा तयार करून समस्या निर्माण करणाऱ्या पेशींना उष्णतेच्या मदतीने निष्क्रीय केले जाते. काही वर्षांपूवींपर्यंत अशा गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना अनेकदा पेसमेकर लावावा लागत होता.

Advertisement
Tags :

.