For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umdi accident | पंढरपूर-विजयपूर महामार्गावर काळजाचा थरकाप! कंटेनर आणि इको कारचा भीषण अपघात, चालक ठार

05:13 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
umdi accident   पंढरपूर विजयपूर महामार्गावर काळजाचा थरकाप  कंटेनर आणि इको कारचा भीषण अपघात  चालक ठार
Advertisement

                            उमदी येथे इको गाडीचा भीषण अपघात

Advertisement

उमदी -पंढरपूर-विजयपूर या वर्दळीच्या महामार्गावर उमदी गावाजवळ कंटेनर आणि इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात इको कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा मृत्यू झाला आहे. उमदी येथील स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कारमधील इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

पंढरपूर-विजयपुर महामार्गावरून प्रवास करणारी इको गाडी आणि समोरून येणारा कंटेनर यांची उमदी जवळील पंचायत समिती सदस्य सावंतयांच्या घराजवळ जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की इको गाडीचा दर्शनी भाग व ड्रायव्हरच्या उजव्या बाजूचा मागील दरवाजा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

अपघातवेळी इको गाडीत प्रवासी अडकून पडले होते. उमदी येथील तरुणांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या कष्टाने गाडीचे दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठीजवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांचे प्राण वाचले आहेत.

पंढरपूर-विजयपूर हा केंद्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो अबझड वाहने आणि प्रवाशांची ये-जा असते. या अरुंद रस्त्याच्या व बाढत्या वेगामुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. या मार्गावर वाहनांचा अधिक वेग असून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. दिशादर्शक फलक व स्पीडब्रेकरची मागणी आहे.

Advertisement
Tags :

.