Satara News | चाफळ परिसरात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; पिता-मुलीचा मृत्यू, एक चिमुकली गंभीर
चाफळजवळ भीषण अपघात; पिता-मुलीचा जागीच मृत्यू
चाफळ : दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात माजगाव (ता. चाट्या) येथील पिता मुलीचा मृत्ला आहे. हृदयद्रावक नाणेगाव गावठाण परिसरात झालेल्या या अपघातात दुसरी ६ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन आत्माराम पाटील (वय ३६) आणि त्यांची ९ वर्षांची मुलगी शिवन्या नितीन पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर अवनी नितीन पाटील (वय ६) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव येथील शेतकरी नितीन पाटील हे आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकी वरून काही कामानिमित्त उंब्रजकडे जात होते. त्यांची दुचाकी नाणेगाव गावठाणनजीक पोहोचली असता, समोरून येणाऱ्या भरधाव इको कारने (क्र. एमएच १२ जीआर २४८१) दुचाकीला जोरदार धडकदिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या भीषण अपघातात नऊ वर्षांची शिवन्या पाटील हिचा जागीच मृत्यू गंभीर अवस्थेतील यधील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुसरी मुलगा अवनी ही गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी कारचालक वैभव निवास पाटील (रा. चाफळ) याला ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.