महामोर्चा संदर्भातील सुनावणी 24 रोजी
कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महामोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी समिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी मंगळवार दि. 24 रोजी होणार असून यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. महेश बिर्जे व समिती नेत्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा पोलिसी बळाचा वापर करून धर्मवीर संभाजी चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती नेते व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले. तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली. पोलिसांनी कोरोनाचे कारण देत कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले. यातील बरेचशे संशयित कार्यकर्ते न्यायालयात गैरहजर राहत आहेत. त्यामुळे मंगळवार दि. 24 रोजी सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
खटला क्रमांक 145/2021 पाचवे अतिरिक्त न्यायालय बेळगाव येथे वरचेवर गैरहजर राहणाऱ्यांना न्यायालयाने अटक वॉरंट काढणार असल्याची सक्त ताकीद दिली आहे. तरी खटल्यातील मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, किरण गावडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, बंडू केरवाडकर, गजानन पाटील, संदीप चौगुले, दिगंबर कातकर, परेश शिंदे, विनायक सांबरेकर, हणमंत मजुकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील, कृष्णा गुरव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.