For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोकाट कुत्र्यांसंबंधीची सुनावणी पूर्ण

10:31 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोकाट कुत्र्यांसंबंधीची सुनावणी पूर्ण
Advertisement

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी मोकाट कुत्र्यांच्या प्रकरणातील सुनावणी संपल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यांवरील त्यांच्या पूर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. न्या. विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने अॅमिकस क्युरी गौरव अग्रवाल यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. सुनावणीदरम्यान गौरव अग्रवाल यांनी पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांनी उचललेल्या पावलांचा थोडक्यात आढावा सादर केला.  न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीवेळी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा दर वाढवण्याच्या निर्देशांचे पालन करण्यात राज्य सरकारे अपयशी ठरल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.