6 अपात्र आमदारांच्या याचिकेवर 18 मार्चला सुनावणी
हिमाचलमधील काँग्रेसचे अपात्र आमदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांकडून अपात्र ठरविण्यात आलेल्या काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 18 मार्च रोजी सुनावणी करणार आहे. या आमदारांनी अलिकडेच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत ‘क्रॉस वोटिंग’ करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते.
हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसकडून दाखल याचिकेवर सुनावणी करत 6 आमदारांना अपात्र घोषित पेले होते. संबंधित अपात्र आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पठानिया यांच्यासोबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनाही प्रतिवादी केले आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांच्या बाजूने मतदान केले हेते. तसेच ते अर्थसंकल्पावरील मतदानादरम्यान देखील अनुपस्थित राहिले होते.