सीमाप्रश्नाच्या खटल्याची आज सुनावणी
बुधवारची सुनावणी टळली
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बुधवारी पुन्हा टळली. खटल्यासाठी निर्धारित वेळ मिळू न शकल्याने सुनावणी होऊ शकली नाही. जमेची बाब म्हणजे गुरुवार दि. 24 रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे गुरुवारी तरी या खटल्यावर सुनावणी होणार का? याकडे सीमावासियांचे लक्ष लागले आहे.
सीमाप्रश्नाच्या खटल्याला गती आली असली तरी सुनावणी होऊ शकलेली नाही. मागील सलग तीन सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इतर खटल्यांमध्ये न्यायालयाचा वेळ गेल्याने सीमाप्रश्नाच्या खटल्यासाठी निश्चित वेळ मिळू शकला नाही. यामुळे बुधवार दि. 23 रोजी होणारी सुनावणी टळली.
गुरुवार दि. 24 रोजी सुनावणी होणार असल्याचे बुधवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले. सीमाप्रश्नाच्या खटल्याकडे सीमाभागाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र सरकारकडून नव्या विधिज्ञांची नेमणूक झाल्याने खटल्याला बळ मिळाले असून आता सुनावणी होणे आवश्यक आहे.