सुलेमान खानच्या कोठडीबाबत सुनावणी पूर्ण
12:41 PM Feb 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
3 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार
Advertisement
पणजी : जमीन बळकाव प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलेमान खानचा ताबा एसआयटीला देण्यासंबंधी सुनावणी पणजी सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे.न्यायालयाने निवाडा राखून ठेवला असून 3 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. एसआयटीच्या कोठडीतून एका कॉन्स्टेबलच्या सहाय्याने सुलेमान खानने पलायन केल्यामुळे त्याची चौकशी करण्यास वेळ मिळाली नसल्याचा दावा करून एसआयटीने न्यायालयात धाव घेतली होती. तपास करण्यासाठी सुलेमानला एसआयटीच्या कोठडीत घेणे महत्त्वाचे आहे, या मागणीसाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. सदर अर्ज फेटाळला गेल्यामुळे सत्र न्यायालयात या निवाड्याला आव्हान देण्यात आले होते. सत्र न्यायालयात सोमवारी अंतिम सुनावणी पूर्ण झाली असता निवाडा राखून ठेवण्यात आला.
Advertisement
Advertisement