मद्य धोरणसंबंधी याचिकेवर 9 मार्च रोजी सुनावणी
06:01 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय 9 मार्च रोजी सुनावणी करणार आहे. सीबीआयने राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने गेल्याच आठवड्यात केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह सर्व 23 जणांना निर्दोष सोडले होते. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केल्यानंतर सीबीआयने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पुढील सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती स्वरणकांत शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.
Advertisement
Advertisement