कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्ण जन्मभूमी-मशीद वादावर आता 12 सप्टेंबरला सुनावणी

06:02 AM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयात युक्तिवाद : आक्षेप नोंदवण्याचे निर्देश

Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

Advertisement

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीच्या मालकी हक्काच्या वादात अलाहाबाद उच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी सुनावणी झाली. मशिदीच्या बाजूने केवळ प्रातिनिधिक खटला क्रमांक 17 वर सुनावणी घेण्याची आणि इतर खटल्यांवरील सुनावणी थांबवण्याची मागणी केली. या जागेला मंदिर म्हणून ओळखणारा दिवाणी खटला दाखल करणाऱ्यांनी या मागणीला विरोध केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वांना आक्षेप नोंदवण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणीची तारीख 12 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 पासून अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी थेट अयोध्या रामजन्मभूमी वादाच्या धर्तीवर सुरू आहे. हे प्रकरण लवकरच निकाली काढण्यासाठी न्यायालयाने अनेक याचिका एकत्रित करून सुनावणी सुरू केली आहे.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादाशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणावर युक्तिवाद झाला. न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांचे एकल खंडपीठ त्यावर पक्षकारांच्या बाजू ऐकून घेत आहे. हा वाद श्रीकृष्ण जन्मभूमी संकुल आणि त्याच्या जवळ असलेल्या शाही ईदगाह मशिदीशी संबंधित आहे. ही मशीद भगवान कृष्णाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जागेवर बांधल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. त्याचवेळी, मुस्लीम बाजू मशिदीच्या ऐतिहासिक आणि कायदेशीर वैधतेवर आग्रह धरताना दिसते. हा मुद्दा केवळ धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही तर त्यात मंदिराच्या जमिनीची मालकी, पूजा करण्याचा अधिकार आणि पुरातत्वीय तपासणी यासारखे मुद्दे देखील समाविष्ट आहेत. सध्या या वादाशी संबंधित 18 हून अधिक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article