कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणगुत्ती खटल्याची सुनावणी लांबणीवर

11:36 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मणगुत्ती ता. हुक्केरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवप्रेमींनी आवाज उठविला होता. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. यावेळी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते दिनेश कदम यांच्यावर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याने या खटल्याची संकेश्वर येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवार दि. 31 रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 12 ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने मणगुत्ती गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते दिनेश कदम आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेत न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी संकेश्वर येथील न्यायालयात सुरू आहे. या खटल्याची सुनावणी गुरुवार दि. 31 रोजी होती. पण सदर सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 12 ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हजर होते. दिनेश कदम यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. रिचमॅन रिकी काम पाहत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article