महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

12:28 PM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसच्या 10 आमदारांच्या भाजप प्रवेशाचे 2019 मधील प्रकरण

Advertisement

पणजी : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या 10 आमदारांच्या बाजूने निकाल देणाऱ्या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवर आज दि. 4 रोजी सुनावणी होणार आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आमदारांच्या अपात्रतेची याचिका फेटाळणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर घटनेच्या 10 व्या अनुसूचीचा अर्थ तसेच कायद्याच्या उद्देशाशी सुसंगत अर्थ लावण्याची विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने मगो, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदार आणि मगोच्या तीनपैकी दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement

त्यानंतर चोडणकर यांनी सदर आमदारांना अपात्र ठरविण्यासंबंधी सभापतींकडे याचिका दाखल केली. मात्र सभापतींनी ती याचिका फेटाळून लावली. त्या निर्णयाला चोडणकर यांनी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले. तेथे न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी पक्ष बदलल्यामुळे पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेची शिक्षा लागू होत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने देत सभापतींचा आदेश कायम ठेवला होता. त्यामुळे चोडणकर यांनी नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पुढे विधानसभेचा कालावधी संपून नव्याने निवडणूकही झाली. त्यामुळे सदर आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय दुय्यम ठरला आहे. आता केवळ घटनेच्या 10 व्या अनुसूचीचा अर्थ तसेच कायद्याच्या उद्देशाशी सुसंगत अर्थ स्पष्ट होणे एवढेच या याचिकेला महत्व राहिले आहे. त्यावर आज न्यायालयात कोणता निर्णय होतो यावर पुढील पक्षांतरे आणि अपात्रता यांचे कायदेशीर महत्व अधोरेखित होण्याची आशा आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article