For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगाव-यरमाळ रोडवर कचऱ्याचे ढिगारे

12:16 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
वडगाव यरमाळ रोडवर कचऱ्याचे ढिगारे
Advertisement

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज

Advertisement

बेळगाव : वडगाव-यरमाळ रोडवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. शहरातील कचरा या रस्त्यावर आणून टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांकडून हा कचरा इतरत्र ओढून नेला जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने हा कचरा हटवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वडगावच्या काही भागात कचरा उचल करणारी घंटागाडी फिरत नसल्याने जागा मिळेल तेथे कचरा फेकला जात आहे. शिवारातून यरमाळकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना ये-जा करणेही अवघड होत आहे. अनेकवेळा भटक्या कुत्र्यांमुळे ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही दिवसांत कचरा उचल केला जातो. त्यानंतर मात्र पुन्हा आहे तीच परिस्थिती निर्माण होत आहे.

रस्त्याशेजारी कचरा फेकल्याने संताप

Advertisement

वाहनांमधून आणलेला कचरा रस्त्याशेजारी फेकला जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून सर्व प्लास्टिक वाहून पुन्हा शेतामध्ये शिरत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आसपासच्या रहिवाशांनाही या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.