केएलईकडून लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा
काहेरचे रजिस्ट्रार डॉ. एम. एस. गणाचारी : रेनल पॅथॉलॉजी कार्यशाळेचे उद्घाटन
बेळगाव : बेळगाव भागातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक जोर दिला जात असून यासाठी अनुदानही दिले जात आहे. यासाठी विद्यापीठाने एक स्वतंत्र शाखा स्थापन केली आहे. केएलईच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवत आहोत, अशी माहिती काहेरचे रजिस्ट्रार डॉ. एम. एस. गणाचारी यांनी दिली. केएलई संस्था संचालित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या नेफ्रोलॉजी विभागाच्यावतीने आयोजित रेनल पॅथॉलॉजी कार्यशाळेचे उद्घाटन करून ते बोलत होते. गणाचारी म्हणाले, लोकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी विशेषत: ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक संशोधनही करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कर्नल डॉ. एम. दयानंद म्हणाले, विविध विद्यापीठांच्या सहकार्याने चालू संशोधनाद्वारे आरोग्य विकासावर भर दिला जात आहे. तंत्रज्ञान बदलत असताना वैद्यकीय प्रणाली लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. मूत्रपिंडसंबंधी सर्व उपचार करण्यात येत असून याचा नागरिकांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. एन. एस. महांतशेट्टी म्हणाले, संस्थेतील मूत्रपिंड विभाग मूत्रपिंड समस्यांचे लवकर निदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पॅथॉलॉजीशिवाय रोगाचे निदान करणे कठीण असून बायोप्सी करूनच समस्या ओळखता येते, असे त्यांनी सांगितले. गुजरात येथील नाडियाड मुलजीबाई पटेल युरोलॉजीकल हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजीस्ट डॉ. उमापती हेगडे, गुजरात युनिव्हर्सिटीचे रेनल पॅथॉलॉजीस्ट डॉ. लवलेश निगम, मणिपाल हॉस्पिटलमधील रेनल प्ा@थॉलॉजीस्ट डॉ. महेश वंकलकुंटी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मल्लिकार्जुन करिशेट्टी, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. राजेश पवार, डॉ. रितेश वेर्णेकर, डॉ. रवी सारवी, डॉ. गौतम आदी उपस्थित होते.