For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहीहंडी उत्सवासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

11:42 AM Aug 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
दहीहंडी उत्सवासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
Advertisement

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे योगदान

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून त्या निमित्ताने दहीहंडी फोडताना युवकांना गंभीर अपघात झाल्यास त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज राहण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे ,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे, यांना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी विनंती केली असून ज्यादा कर्मचारी व डॉक्टर तसेच एक्स-रे मशीन , सिटीस्कॅन मशीन सज्ज राहण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सज्ज राहील असे यंत्रणेने मान्य केले असून राजु मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

एखादा युवक दहीहंडी फोडताना कोसळल्यास गंभीर दुखापत होते. यासाठी 108 रुग्णवाहिका सज्ज राहावी , गोवा बांबुळी तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा गंभीर युवकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी जिल्ह्यातील 50 टक्के रुग्णवाहिका राखीव सज्ज राहावे, त्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांना सुद्धा अशा प्रकारची विनंती केली असून ती सुद्धा मान्य झाल्याचे सांगण्यात आले . कुठलाही युवक गंभीर प्रसंगाच्या वेळी त्याला आरोग्य यंत्रणेचा लाभ मिळावा अशी मागणी सुद्धा सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.