For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार खात्याकडून आरोग्य योजना

11:10 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार खात्याकडून आरोग्य योजना
Advertisement

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वृत्तपत्र विव्रेत्यांची राज्य सरकारकडून दखल

Advertisement

बेळगाव : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार खात्याने आरोग्य योजना सुरू केली आहे. 16 ते 59 वयोगटातील वृत्तपत्र विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्यास लाभार्थ्याला 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. यामुळे बेळगावसह राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना आता आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.दररोज वाचकांपर्यंत वेळेत वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांना यापूर्वी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. वृत्तपत्र विक्रेते हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात. तसेच काही वेळेसाठीच वृत्तपत्र टाकण्याचे काम असल्यामुळे या कामगारांना सुविधा मिळत नव्हत्या. सायकल तसेच दुचाकीवरून पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत वृत्तपत्र घरोघरी पोहोचविण्याचे काम ते करत असतात.

या दरम्यान अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु असंघटित क्षेत्रात हे कामगार येत असल्याने त्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.याची दखल घेत राज्य सरकारच्या कामगार विभागाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ‘कर्नाटका स्टेट न्यूजपेपर डिलीव्हरी वर्कर्स अॅक्सिडेंट बेनिफीट अँड मेडिकल असिस्टंट्स स्कीम’ सुरू करण्यात आली आहे. इपीएफ व ईएसआय नसलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ  घेता येईल. आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व बँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे.www.eshram.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल केले जात आहेत. बापूजी सेंवा केंद्र, पोस्ट ऑफीस, कर्नाटक वन, ग्राम वन, तसेच जवळील सीएससी केंद्रावर अर्ज दाखल करू शकता.

Advertisement

ई कॉमर्स कर्मचाऱ्यांना विमा योजना

फूड डिलिव्हरी, ई कॉमर्स, तसेच विविध ऑनलाईन डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कामगारांना विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू झाल्यास 4 लाख रुपये, कायमस्वरुपी दिव्यांगत्व आल्यास 2 लाख रुपये, गंभीर आजारासाठी 1 लाखापर्यंत मदत व आरोग्य विम्याचे 2 लाख रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

Advertisement
Tags :

.