आझाद मैदानात आंदोलनस्थळी आरोग्यविषयक खबरदारी
आंदोलनस्थळी संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी/ पणजी
पणजीतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून लोकचळवळीतून पाळे-शिरदोणवासीयांचे आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर पाळे-शिरदोणवासीयांना तसेच इतरांनाही कोणताही आरोग्यविषयक धोका होऊ नये, यासाठी आंदोलनस्थळी संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आझाद मैदानावर आरोग्यविषयक खबरदारी घेण्यात येत आहे.
आंदोलनस्थळी लोक मोठ्या संख्येने जमत असल्याने एकमेकांशी संपर्क साधताना हात न मिळवता नमस्कार करून संवाद साधावा, अशा प्रकारे मार्गदर्शक सूचना देण्यासाठी फलक उभारले आहेत. याशिवाय लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना सुरक्षात्मक उपायांकडे दुर्लक्ष करू नयेत, याकडेही आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. आंदोलनकर्ते नागरिक किंवा इतरांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्वरित उपचार व्हावेत, यासाठी 108 ऊग्णवाहिकाही आझाद मैदानावर उपलब्ध आहे. आयोजकांनीही आंदोलन यशस्वी करण्याबरोबरच आरोग्यदृष्टीनेही खबरदारी घेतली असून, आरोग्याची सुरक्षा राखण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.