Kolhapur News | मोरेवाडीत पिण्याच्या पाण्यात मृत मासे आढळल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
भुदरगड - भुदरगड तालुक्यातील मोरेवाडी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या मासे जॅकवेलमध्ये हजारो मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जॅकवेलमध्ये बेकायदेशीर मासेमारीसाठी विषारी पदार्थांचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. रविवारी रात्री काहीना हा प्रकार आढळून आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना दिसून आले.
विशेष म्हणजे हे मृत मासे गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जॅकवेलमध्येच आढळल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबत मोरेवाडी : येथील पिण्याच्या पाण्याच्या जॅकेवल व ओहोळ पात्रात आढळलेलेगंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य रोगांचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. अहवाल प्राप्त होईपर्यंत जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या बोअरवेलद्वारे पर्यायी पाणीपुरवठा सुरू आहे.परिसरात काही दिवसांपासून संशयास्पद पद्धतीने मासेमारी सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित यंत्रणा अनभिज्ञ कशा राहिल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याची सखोल चौकशी करून वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पाण्याचे नमुने पाठविले तपासणीसाठी
पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम : मोरेवाडीच्या जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मृत आढळल्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जॅ कवेलमधील पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून गावाला सध्या बोअरवेलद्वारे पर्यायी पाणीपुरवठा केला जात आहे. तपासणी अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.