रस्त्यावर कचरा आढळल्यास आरोग्य निरीक्षक जबाबदार
कोल्हापूर :
शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळल्यास संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार आहे. शहरातील कच्रयाबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची संयुक्त आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी आढावा घेताना यामध्ये सर्व आरोग्य निरिक्षक यांनी दैनंदिन सकाळी सहा वाजता भागामध्ये हजर राहून फिरती करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना फिरती करताना काही ठिकाणी कामावर नसताना हजेरी मांडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुकादम जर बोगस हजेरी मांडत असतील तर आरोग्य निरिक्षक यांनी पडताळणी केली पाहिजे. अशा चुकीच्या पध्दतीने हज्रया मांडल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही. त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल. कामामध्ये कोणतीही हलगर्जी झाल्यास मुकादम व आरोग्य निरिक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. आरोग्य विभागाला जादा 30 टिप्पर कचरा उठावासाठी दिली असल्याने आता शंभर टक्के कचरा उठाव झाला पाहिजे. जर फिरती करताना कचरा रस्तेच्या बाजूला आढळून आल्यास पहिल्यांदा मुकादम व आरोग्य निरिक्षक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. यामध्ये कोणतीही सुधारणा न झालेस संबंधीतांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या.
त्याचबरोबर टिप्परद्वार कचरा नेताना रस्त्यावर कोठेही कचरा सांडणार नाही याची दक्षता घेण्याची ताकीदही देण्यात आली . ओला व सुका कचरा असा वेगवेळा गोळा करावा. मोठमोठया अपार्टमेंटमध्ये त्यांचा कचरा त्याच ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नागरीकांच्यात जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर नागरीकानी कचरा घंटागाडीतच टाकावा, प्लॅस्टिकचा वापर करु नये असे आवाहन करुन नागरीकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधिकारी आणि सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.