आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह उद्या सावंतवाडीत
सावंतवाडी | प्रतिनिधी
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोल्हापूर खंडपीठाच्या चार सदस्य समितीने दोन दिवसापूर्वीच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली आणि हा चौकशी समितीचा अहवाल 17 ऑक्टोबरला कोल्हापुरातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सादर केला जाणार आहे . याच पार्शभूमीवर उद्या शनिवारी 11 ऑक्टोबरला पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह हे या रुग्णालयाला भेट देणार आहेत त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या आणि डॉक्टरांची कमतरता याबाबत ते आता काय निर्णय घेतात हे स्पष्ट होणार आहे. श्री सिंह हे ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात येत असून त्यांचा दौरा ११ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजल्यापासून सावंतवाडी येथील खालील कार्यालयांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतील. तसेच आवश्यक सूचना करणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावंतवाडी, तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी, पंचायत समिती, सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यानंतर ते बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यालयासही भेट देणार आहेत. सावंतवाडी येथील या भेटीदरम्यान ते स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि विकास कामांचा सखोल आढावा घेतील. प्रशासकीय गतिमानता आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला गेल्या आठवडाभर डॉक्टर ,नर्स यांना फक्त रुग्णालयाच्या तपासणीसाठी गेल्या चार दिवसापूर्वी जागरूक नागरिकांनी तपासणी केली होती व भेट दिली होती त्यानंतर खंडपीठाच्या न्यायालय समितीने पाहणी केली आणि चौकशी अहवाल ते तयार करणार आहेत त्यानंतर आता आरोग्य विभागाचे सचिव सिंह यांचा दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आरोग्य विभागाचे सचिव हे प्रथमच येत आहेत एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे अशा स्थितीत सिंह हे भेट देणार आहेत