For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara District Hospital | आरोग्य विभागात खळबळ ! साताऱ्यात मृतदेहांच्या अदलाबदलीप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबित

04:27 PM Apr 02, 2026 IST | NEETA POTDAR
satara district hospital   आरोग्य विभागात खळबळ   साताऱ्यात मृतदेहांच्या अदलाबदलीप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ  युवराज करपे निलंबित
Advertisement

                  साताऱ्यात महिनाभरात दोनदा मृतदेह बदलले

Advertisement

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांच्या अदलाबदलीच्या गंभीर प्रकारामुळे शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची पहिली बातमी दैनिक तरुण भारत यांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्य शासनाने तातडीने दखल घेत चौकशी समिती नेमली. प्राथमिक तपासात कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात दोन वेळा मृतदेहांची अदलाबदली झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशीही करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.