For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

10:20 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
Advertisement

यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबीर भरवून - घरोघरी ग्रामस्थांना औषधांचे वितरण

Advertisement

वार्ताहर /सांबरा

सांबरा येथे आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ग्रामस्थांना औषधांची वितरण करण्यात आले. येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बुधवारी सांगता झाली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये आरोग्य शिबीर भरवुन व घरोघरी जाऊन ग्रामस्थांना औषधांचे वितरण करण्यात आले. यात्रेनंतर गावामध्ये रोगराई पसरू नये म्हणून जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली व बैठकीनंतर गावामध्ये आरोग्य शिबिर भरवुन स्वच्छता मोहीम राबविली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ, ता. पं. ए. इ. ओ. राम रे•ाr पाटील, शिरूर डॅमचे पाणीपुरवठा अधिकारी एस. के. पाटील, पीडीओ सिद्धलिंग सरूर, ग्रा. पं. सदस्य महेश कुलकर्णी, लक्ष्मण कोळ्यापगोळ, राहुल गावडे, काशिनाथ धर्मोजी, गुऊनाथ अष्टेकर, शांतेश हिरेमठ आदी उपस्थित होते. यात्रा काळामध्ये अनेकांना उलटी जुलाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच पूर्व खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गुऊवारी गावामध्ये घरोघरी भेटी देऊन सर्वांना औषधांचे वितरण केले. व पाणी स्वच्छ पिण्याचे आवाहन केले.

Advertisement

गुरुवारीही केली गावातील कचऱ्याची उचल

यात्रा काळामध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. यात्रेदरम्यान सोमवारी जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक, ग्राम पंचायत सदस्यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत कचऱ्याची उचल करून विल्हेवाट लावली होती. गावामध्ये रोगराई पसरू नये म्हणून गुऊवारी ही स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची उचल करण्यात आली. गावातील समाजसेवक व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी हा उपक्रम राबविल्याने गावामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.