For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील 49,936 मुलांची आरोग्य तपासणी

11:20 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील 49 936 मुलांची आरोग्य तपासणी
Advertisement

राष्ट्रीय बाल आरोग्य समितीची बैठक : 11 मुलांची पुढील उपचारासाठी शिफारस

Advertisement

खानापूर : राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याबाबतची बैठक मंगळवारी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण खाते, समाज कल्याण खाते यासह इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नावर यांनी शासनाच्या राष्ट्रीय बाल आरोग्य उपक्रमाविषयी माहिती दिली. शासनाचे बालकांचे आरोग्य आणि कुपोषण नष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. बालकांच्या आरोग्याची शासनाकडून योग्य ती काळजी घेण्यासाठी शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर जरुर असल्यास योग्य ते उपचार शासनाकडून केले जाणार आहेत.

शासनाकडून उपचाराची व्यवस्था

Advertisement

या उपक्रमात तालुक्यातील 387 अंगणवाड्या, 401 शाळा, 7 पदवी महाविद्यालये आणि 11 वसतिगृहातील एकूण 49,936 मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय दोष आढळलेल्या 11 मुलांना पुढील उपचारांसाठी शिफारस करण्यात आली असल्याचे यावेळी डॉ. किवडसन्नावर यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी बाल आरोग्य सेवा उपक्रम योग्य पद्धतीने राबवण्यात यावा, आणि मुलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी, तसेच ज्या मुलांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्यांना शासनाकडून सर्वप्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश दिले.

Advertisement
Tags :

.