For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रिंक ऑर्डरपूर्वी होते आरोग्य तपासणी

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ड्रिंक ऑर्डरपूर्वी होते आरोग्य तपासणी
Advertisement

अनोखा बार : कारण जाणल्यावर व्हाल थक्क

Advertisement

सद्यकाळात मोठ्या शहरांमध्ये युवांचे जीवन भरधाव वेगाने धावत आहे. दीर्घ कामाचे तास, कारकीर्दीचा दबाव, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि फास्ट फूडसारख्या सवयी आता सामान्य ठरल्या आहेत. अशा वातावरणात लोक दिलासा आणि आरोग्य दोन्ही इच्छितात. याच आवश्यकतेला समजून घेत चीनच्या शांघाय शहरात अनोखी सुरुवात करण्यात आली आहे. येथे एक असा बार सुरू झाला आहे, जेथे ड्रिंक ऑर्डर करण्यापूर्वी संबंधितांच्या आरोग्याची तपासणी केली होती.

शांघायमध्ये काही बार असे आहेत, जेथे ‘हेल्थ कॉकटेल’ देण्यापूर्वी पारंपरिक चिनी चिकित्सेच्या आधारावर लोकांचे नाडी परीक्षण केले जाते. एक पदव्युत्तर विद्यार्थिनी हेलन झाओ या बारमध्ये जेव्हा पोहोचते, तेव्हा सर्वप्रथम स्वत:च्या दोन्ही हातांना पुढे करते, डॉक्टर तिची नाडी पाहून शरीराची स्थिती समजतात, यानंतर मिक्सोलॉजिस्ट (ड्रिंक तयार करणारा तज्ञ)  तिच्या आरोग्यानुसार खास  वनौषधींनी निर्मित कॉकटेल तयार करतो. हा अनुभव साधारण बारपेक्षा अत्यंत वेगळा आहे, कारण येथे मद्याच्या बाटल्यांच्या ऐवजी भिंतींवर औषधे आणि वनौषधींनी कपाट सजलेले असतात.

Advertisement

‘पंक वेलनेस’चा वाढता प्रकार

सध्याचे युवा ‘पंक वेलनेस’ नावाच्या विचाराला अवलंबित आहेत. याचा अर्थ व्यग्र आणि तणावपूर्ण जीवनादरम्यान  आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष न करणे. 26 वर्षीय झाओचे जीवन सामान्य युवांसारखेच रात्री उशिरापर्यंत काम करणे अणि बाहेरचे खाण्यावर आधरित आहे. परंतु कामानंतर एक ड्रिंक घेतेवेळी जर तिला स्वत:च्या आरोग्याविषयी किंचित माहिती मिळाली तरीही दिलासा मिळतो. युवांसाठी हे केवळ मौजमजेचे स्थान नाही, तर स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरुक होण्याची एक नवी पद्धत ठरत आहे.

पारंपरिक चिकित्सा

वनौषधी आणि मद्याचा मेळ नवा नाही. पारंपरिक चिनी चिकित्सेत ‘मेडिसिनल वाइन’ म्हणजेच औषधीय मद्याचा उल्लेख अत्यंत जुना आहे. या बारच ाउद्देश कुठल्याही आजारावर उपचार करणे नाही. याचा उद्देश केवळ लोकांना स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरुक करणे ओ. येथे देण्यात येणारे ड्रिंक्स एकप्रकारे आरोग्य जागरुकतेचा संदेश देते असे वक्तव्य बारच्या टीसीएम तज्ञांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.